Ad will apear here
Next
‘त्रिवेणी’ संगमात रसिकांना शब्द-सुरांचे स्नान
रत्नागिरीत गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना मानवंदना


रत्नागिरी :
सप्तसूर म्युझिकल्स आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने आयोजित केलेल्या संगीतमय ‘त्रिवेणी’ संगमात रत्नागिरीकर रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले. गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी रत्नागिरीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 





या कार्यक्रमातून तिन्ही दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कलाकृतींचा अनुभव घेण्यासाठी आणि युवा कलाकारांचे दमदार सादरीकरण ऐकण्यासाठी सभागृह तुडुंब भरले होते. ब्राह्मण मंडळाच्या श्री भगवान परशुराम सभागृहात कार्यक्रम झाला. सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी, आशा पंडित, राधिका वैद्य, प्रदीप तेंडुलकर, मधुसूदन लेले, दीपक पोंक्षे, सुहास सोहनी यांनी दीपप्रज्ज्वलन केले. कार्यवाह राजेंद्र पटवर्धन यांनी ‘सप्तसूर मुझिकल्स’चे निरंजन गोडबोले व विघ्नेश जोशी यांचा सत्कार केला. कलाकारांचे स्वागत अविनाश काळे, संदीप रानडे, राधिका वैद्य, अनुजा आगाशे यांनी केले. कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविक केले. 



कार्यक्रमात सुरुवातीला अजिंक्य पोंक्षे याने ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ हे गीत सुरेखपणे सादर केले. रसिकांच्या टाळ्या पडल्या आणि कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. अभिनेते विघ्नेश जोशी यांनी गदिमा, पुलं व बाबूजींच्या अनेक आठवणी ओघवत्या वाणीत सांगितल्या.

विघ्नेश जोशी यांचा सत्कार

इंद्रायणी काठी, शब्दावाचून कळले सारे, आकाशी झेप घे रे, ही गीते अजिंक्यने सुरेल आवाजात म्हटली व टाळ्या घेतल्या. कबिराचे विणतो शेले, हसले मनी चांदणे ही गीते युवा गायिका हिमानी भागवतने उत्तम प्रकारे सादर केली. एकाच या जन्मी, अहो सजणा दूर व्हा, गं बाई माझी करंगळी, ही गीते प्रियांका दाबके हिने सादर केली आणि त्यांना रसिकांनी दाद दिली. हरहुन्नरी गायक अभिजित भट याने, कधी बहर कधी शिशिर, स्वर आले दुरुनी, निजरूप दाखवा हो... ही वैविध्यपूर्ण गीते ताकदीने सादर केली. अभय जोग यांचे ‘पराधीन आहे जगती,’ अजिंक्य व हिमानीचे ‘विकत घेतला श्याम,’ हिमानी व अभिजितचे ‘स्वप्नात रंगले मी,’ अभिजित व प्रियांकाचे ‘नवीन आज चंद्रमा’ ही गीतेही तितकीच रंगली. ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

निरंजन गोडबोले यांचा सत्कार

निरंजन गोडबोले (हार्मोनियम), चैतन्य पटवर्धन (की-बोर्ड), उदय गोखले (व्हायोलिन), निखिल रानडे (तबला) आणि हरेश केळकर (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. 

(कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZVBBU
Similar Posts
गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना त्रिवेणी कार्यक्रमातून मानवंदना रत्नागिरी : गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके म्हणजेच बाबूजी आणि अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची दैवतं. अशा या त्रयीचा जन्मशताब्दी महोत्सव यंदा साजरा होत आहे. या त्रिमूर्तीमधील समान धागा म्हणजे यांचे संगीतातील अमूल्य योगदान. हाच धागा पकडून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी
नगर वाचनालयातर्फे कथाकथन व निबंधलेखन स्पर्धा रत्नागिरी : सध्याचे वर्ष हे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे (पुलं), आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखले जाणारे ग. दि. माडगूळकर (गदिमा) व संगीतातील अध्वर्यू व्यक्तिमत्त्व सुधीर फडके (बाबूजी) या त्रयीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयातर्फे निबंध व कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक रत्नागिरी : आषाढी एकादशीला उदयोन्मुख, युवा कलाकारांनी सादर केलेल्या अभंगवाणी कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगून गेले. ‘सप्तसूर म्युझिकल्स’ची निर्मिती असलेला हा कार्यक्रम अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात झाला. विविध संतांच्या रचना गायकांनी सुरेल आवाजात सादर केल्या
रत्नागिरीत १९ एप्रिलला रंगणार ‘गीतरामायण’ रत्नागिरी : सुधीर फडके (बाबूजी) आणि ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त इंद्रधनुष्य यांच्या वतीने गीतरामायणाचा कार्यक्रम १९ एप्रिल २०१९ रोजी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language